गोरेगाव येथे “अवनि गारमेंट वॅनचे” उदघाटन!!
आज दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी गोरेगाव येथे
श्रुतकीर्ती जोशी ह्या लाभार्थीच्या अवनि गारमेंट वॅन चे उदघाटन करण्यात आले.
बहुतांश अवनि फूड वॅन असल्या तरी काही महिलांनी किराणा पासून इतर व्यवसायाना प्राधान्य ह्या अवनि वॅन मध्ये दिले आहे.
अशीच ही अवनि गारमेंट वॅन आपण तयार केली ज्यात जोशी ताईंना विना गुंतवणूक, विना व्याज, विना तारण, विना जामीनदार ह्या तत्वावर दिली आहे.
जोशी ताई ह्या सिंगल मदर आहेत. साधारण 15 वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यांना एक 16 वर्षाचा मुलगा आहे आणि तो महाविद्यालय शिक्षण घेत आहे.
उपजीविका साधन म्ह्णून त्या आकाशवाणी येथे कार्यरत असल्या तरी त्यांची अंगी असलेली गारमेंट संबंधित कला त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.
अशातच त्यांना अवनि वॅन बद्दल माहिती मिळाली आणि त्यांनी आम्हाला संपर्क केला.
आम्ही त्यांना सर्वोतपरी सहकार्य करून ही गारमेंट वॅन करून दिली.
ह्या वॅन मध्ये त्या विविध पद्धतीच्या हॅन्डमेड कापडी बॅग्स विक्रीसाठी आहेत.
माझी आपणास विनंती आहे कि दिव्याज्योती बिल्डिंग,शास्त्री हॉल जवळ,गोरेगाव पश्चिम येथे भेट द्यावी.
अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र