पनवेल स्टेशन जवळ अवनि वॅनचे उदघाटन!!
आज दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी पनवेल स्टेशनं जवळ श्रीमती वनिताताई पिसाळ ह्या लाभार्थीला अवनि वॅन मिळवून दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रायगड जिल्हा महिला अध्यक्षा सौं. अदिती सोनार आणि उपजिल्हा अध्यक्ष रामदास पाटील ह्यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
त्याच बरोबर उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर, रोजगार विभाग सोनी हे सुद्धा उपस्तिथ होते.
वनिता ताई ह्या सिंगल मदर असून त्यांना आम्ही ही अवनि वॅन देऊ केली आहे.
वनिता ताई उत्कृष्ट अन्न पदार्थ बनवतात त्याची प्रचिती आम्ही आज त्यांचे खाद्य पदार्थ खाताना घेतली.
आपणही वनिता ताईना प्रोत्साहन देण्याकरिता त्यांच्या अवनि वॅन वर भेट द्या आणि माफक दारात असलेल्या सर्व मराठमोळे पदार्थांचा आस्वाद घ्या.
अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
www.avnivan.com