मानखुर्द पी एम ई जी पी कॉलनी मध्ये अवनि फूड वॅनचे उदघाटन!!!
शंकर साठे हे मानखुर्द मधील समाजसेवक, वय अंदाजे 60 पर्यंत पण ते स्वतःला ज्येष्ठ नागरिक समजत नाहीत आणि ते खरेच आहे हे तुम्हाला त्यांच्या बरोबर सामाजिक विषयावर चर्चा केल्यावर कळेलच.
ह्या शंकर साठे साहेबांनी आमच्या अवनि च्या कार्यालयात येऊन आपल्या परिसरात राहणाऱ्या तरुणांसाठी ह्या अवनि वॅन मिळाव्यात म्हणून त्यांनी अगोदर स्वतः एक अवनि फूड वॅन करून घेतली. आणि तुम्हाला खरे सांगतोय जेव्हापासून त्यांच्या अवनि वॅनची प्रक्रिया चालू झाली तेव्हापासून ह्यांच्या नावाने अवनि साठी बरेच फोन येऊन गेले ही त्यांची सामाजिक बांधिलकी!!
आज 16 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांच्या अवनि वॅन चे माझ्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
विशेष म्हणजे ह्या उदघाटनास सर्वच पक्षाचे नेते हजर होते. त्यात माझे मित्र मनसे मानखुर्द विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर आवर्जून उपस्तिथ होते.
त्यांच्या वॅन वर सकाळच्या न्याहरी पासून संध्याकाळच्या चाट मसाला पर्यंत सगळेच खाद्यपदार्थ उपलब्ध असतील.
अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र