September 8, 2024

Warning: sprintf(): Too few arguments in /home/avnivan/public_html/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 253

दिनांक 13 जून 2024 रोजी सीवूड नवी मुंबई, येथे अवनि लघु उद्योग फिरते खाद्य विक्री केंद्राचे दिमाखात उद्घाटन.

*सौ. स्मिता बबलू चव्हाण ह्या सुशिक्षित गृहिणी असून कोरोना च्या महामारी काळात त्यांचा पतीचा एक मोठा यशस्वी पब्लिकेशन फ्रेंचैसी चा व्यवसाय ठप्प झाला,

तरी त्या माऊलीन हार न मानता आपल्या पतीच्या नोकरीस हातभार लागावा म्हणून घरगुती प्रमाणावर कॅटरिंग ही सुरू केले,

त्यातून सौ. स्मिता चव्हाण ह्यांना अवनि वॅन बद्दल कळाले, तिथून अवनि कुटुंबाने स्मिता आणि बबलू चव्हाण ह्यांना त्यांच्या हक्काचा व्यवसाय उभारून देण्याचे ठरवले*

त्याच अनुषंगाने अवनि टीम ने सौ. स्मिता चव्हाण ह्यांना सर्व संबंधित कागदपत्रे, परवाने व मुख्य मंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमा अंतर्गत व्याज परतावाची सबसिडी देखील मिळवून दिली. आणि मुख्य म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ने कर्ज मंजूर केले.

स्मिता चव्हाण ह्यांचे अवनि खाद्य विक्री केंद्र हे साई बाबा मंदिर, सेक्टर- 48, तांडेल मार्केट, सीवुड नवी मुंबई येथे कार्यरत असणार आहे.

तरी सदर विक्री केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी नवी मुंबई भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष मा. श्री. संदीपजी नाईक, मा. नगरसेवक श्री. विशाल डोळस तसेच अवनि 24 संस्थेचे संस्थापक श्री अनिल फोंडेकर आणि संस्थापिका सौ प्रज्ञा मोहिते ह्यांनी उपस्थित राहून नवीन व्यवसायास प्रोत्साहन दिले.

मग तुम्ही कसली वाट पाहतंय?

आजच आपला स्वहक्काचा व्यवसाय सुरू करा अवनि संगे.

www.avnivan.com

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *