अवनिच्या 365 वॅन मध्ये पहिल्यांदा अवनि फिश वॅन चे उदघाट्न

आज दिनांक 12 जुलै 2024 रोजी घोडपदेव, म्हाडा कोलनी मेन गेट समोर प्रदीप दळवी ह्या मराठा लाभार्थीला अवनि फिश वॅन स्थापन करून दिली.
ह्यात वैशिष्ट्य म्हणजे प्रदीप हा मराठा समाजाचा परंतु आपण एक उद्योजक व्हावे म्हणून गेले 8 वर्ष मासेमारी ह्या व्यवसायात तो आणि त्याची पत्नी कार्यरत आहेत.
कोरोना काळात सगळा उद्योग बुडाल्याने परत एकदा आमच्या साहाय्याने महाराष्ट्र शासन अनुदान आणि व्यवसाय कर्ज घेऊन त्याला अवनि फिश वॅन बनवून दिली.
प्रदीप च्या वॅन वर एकदा या आणि त्याच्याकडे फ्रेश मासे घेऊन तर बघा.
धन्यवाद
अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र







