“अवनि “आता टुरिस्ट कार सुद्धा सरकारी अनुदानातून देत आहे!!!
उभ्या महाराष्ट्र मध्ये माहित आहे कि अवनि म्हणजे लघुउद्योग फिरते विक्री केंद्र.
ती योजना तर आमची चालूच आहे आणि अखंड पणे चालूच राहील. पण त्या पलीकडे माझ्या मराठी बांधवांसाठी जे बरेच वर्ष श्रीमंतकडे ड्राइवर म्हणून इमाने इतबारे नोकरीं करत आहेत मग ह्यांना सरकारी लाभ मिळून स्वतः टुरिस्ट कार घेऊन का लघुउद्योग करू नये?
आणि ह्याची सुरुवात आज 2 ऑगस्ट 2024 रोजी विश्वनाथ भणगे ह्या लाभार्थी पासून केली.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळच्या व्याज परतवा योजनेतून विश्वनाथ भणगे ह्या मराठा समाजाच्या लाभार्थीला मारुती डिझाअर cng टुरिस्ट कार देण्यात आली.
भणगे ह्यांना यूनियन बँकेतून 12 टक्के व्याज दराने वाहन कर्ज वाटप करण्यात आले आणि तेच 12 टक्के व्याज प्रत्येक महिन्यामागे भणगे ह्यांना महामंडळ कडून परत मिळणार असे संमती पत्र मिळाले आहे.
आज दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी लाभार्थी विश्वनाथ भणगे ह्यांना टुरिस्ट कार ची चावी देताना क्षणचित्रे.
अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
मुंबई व्यापारी असोसिएशन