मनसे अध्यक्ष आदरणीय श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या शुभ हस्ते “अवनि” फूड वॅनचे उदघाटन!!!
आज दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी मनसे अध्यक्ष आदरणीय श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या शुभहस्ते शिवतीर्थ ह्या त्यांच्या निवासस्थानी अवनि फूड वॅन चे मोठ्या दिमाखात उदघाटन करण्यात आले.
राजसाहेबांनी सदर उपक्रमाची विस्तृत माहिती घेऊन माझे आणि माझ्या टीमचे कौतुक केले आणि असेच मराठी तरुणांना रोजगार देण्यास सल्ला दिला.
शिवाय शर्मिला वहिनींनी सुद्धा अवनि फूड वॅनचे विशेष कौतुक करून बँक लोन बद्दल जाणून घेतले.
ही अवनि वॅन आम्ही विद्यासागर मोरे ह्या लाभार्थीला विना व्याज, विना तारण, विना जामीनदार आणि zero downpayment ह्या तत्वावर दिली आहे.
अनिल फोंडेकर
सरचिटणीस
रोजगार स्वयंरोजगार
महाराष्ट्र नवनिर्माण सेना