उलवे, नवी मुंबई येथे अवनिच्या पहिल्या वॅन चे उदघाटन!!
सिद्धी राऊत ही खरे तर गिरगांव मध्ये राहणारी पण उलवे शहर हे झपाट्याने विकसित होत असल्याने तिच्या कुटुंबियांनी उलवे ला एक घर घेतले आणि तेथून हाकेच्या अंतरावर सिद्धीने बाण डोंगरी ह्या परिसरात अवनि फूड वॅन सुरु केली. त्याचे आज दि.21मार्च 2024 रोजी आमच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
खरेच तिच्या ह्या व्यापारी वृत्तीला अवनि टीम कडून सलाम!!🙏🙏
सिद्धी तिच्या एका जवळच्या नातेवाईकाबरोबर ह्या वॅन मध्ये विविध मराठमोळे खाद्य पदार्थ विक्री साठी उपलब्ध करणार आहेत.
ह्यासाठी तिच्या संपूर्ण कुटुंबियांची साथ दिसली ह्यावरून आतां मराठी माणसाने नोकरीं पेक्षा व्यवसाय कर हा मोलाचा संदेश दिसून आला हे विशेष.
सिद्धी सारखी एक 22 वर्षाची तरुणी व्यवसायात उतरली त्यात आम्ही सर्वोतपरी सहकार्य केलेच पण तिची व्यवसाय करण्याची जिद्द आणि तळमळ आम्हाला आज खऱ्या अर्थाने दिसली.
मग तुम्ही कधी उतरताय व्यवसाय करायला??
अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक
अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
www.avnivan.com